Friday, 1 August 2014

II विचारले मी डोंगराला II


II विचारले मी डोंगराला II
**************************
विचारले मी डोंगराला..
बाबा का असा कोपला..??
का लेकरांचा बळी घेतला..??
विश्वासाचा गळा घोटल..??

ऐकून माझा सवाल खडा..
कातर शब्दात मज म्हणाला..
अघटीत होते सारे मजला..
नाही मारलं मी कोणाला..!!

जर्जर केले ना तूच मला..
सुरुंग पेरून पोखरल मला..
तुटला आधार काठीचा..
ओरबाडून नेले वनराईला..!!

जर्जर माझ्या शरीराला..
नाही जमले सावरायला..
डोळ्यादेखत लेकर गेली..
जो तो लागला कोसायाला..!!

ऐकून त्याचे कष्टी बोल..
धडा आता शिकलो चांगला..
झाडे जगवा झाडे वाचवा..
तारुण्य लाभू दे डोंगराला..!!
*चकोर*

No comments:

Post a Comment