II सय II
=====
सय ओथंबून वाहे..
माये श्रावणाच्या माहे..
खेळ ऊन पावसाचा
मनी भरून ग राहे..!!
=====
सय ओथंबून वाहे..
माये श्रावणाच्या माहे..
खेळ ऊन पावसाचा
मनी भरून ग राहे..!!
सरीवर सर येई
वेस ओलांडू ती पाहे
मन होई ओले चिंब
पाणी पापण्यांतून वाहे..!!
सवे माहेराची ओढ
वारा गंध धुंद वाहे..
पिंजऱ्यातुन पाखरू
मुक्त झेपावू ते पाहे..!!
ध्यास लागे माहेरचा..
डोळा वाटेवर आहे..
धाड माझ्या ग बंधूला..
लेक भेटू तुज पाहे..!!
सय ओथंबून वाहे
माये श्रावणाच्या माहे..!!
****सुनिल पवार....
✍🏼
वेस ओलांडू ती पाहे
मन होई ओले चिंब
पाणी पापण्यांतून वाहे..!!
सवे माहेराची ओढ
वारा गंध धुंद वाहे..
पिंजऱ्यातुन पाखरू
मुक्त झेपावू ते पाहे..!!
ध्यास लागे माहेरचा..
डोळा वाटेवर आहे..
धाड माझ्या ग बंधूला..
लेक भेटू तुज पाहे..!!
सय ओथंबून वाहे
माये श्रावणाच्या माहे..!!
****सुनिल पवार....

No comments:
Post a Comment