अंकुरु दे बिज..
तू पुन्हा एकदा आलास
दुभंगल्या मनावर फुंकर घालायला।
पण किती वेळ थांबणार आहेस?
हे विसरु नको सांगायला।
तडा पडलेल्या मनाला
जरा वेळ लागेल सांधायला।
पण पुन्हा पाठ फिरवलीस तर
जमणार नाही नातं बांधायला।
वाहू दे रे अश्रू जरासे
लागू दे नाद्या वाहायला।
तू सुद्धा थांब जरा
हा आनंद सोहळा पाहायला।
अंकुरु दे बिज पोटी
लागू दे सहज रांगायला।
कळू दे जगास आता
तू लागला पावसासारखे वागयला।
--सुनिल पवार..✍🏼
No comments:
Post a Comment