Friday, 24 April 2015

।। अंधार रात्रीचा ।।

 ।। अंधार रात्रीचा ।।
****************
रात्रीच्या अंधारास,
लोक उगाच नावे ठेवतात..
होता आधार मग,
हळूच कानी कुजबुजतात..!!

चद्राच्या शितलतेचे,
तेच गुणगाण करतात..
शीतल चांदण्यात मग,
सचैल स्नान करतात..!!

रात्र असते जशी शहाणी,
खट्याळ ज़रा, जराशी वेडी..
चंद्र कला जैसी वाढे,
उत्कंठ प्रेमाची मधुर गोडी..!!

चंद्राच्या चांदण्यांच्या साक्षीने,
आणा भाका घेतात..
मग कशास उगाच ,
लोक रात्रीवर डाफरतात..!!

पाप वसे ज्याच्या मनात,
लपवु पाहे तो काळोखात
थकला भागला जीव पहा,
निजला कसा शांत निवांत..!!
*******सुनिल पवार......

No comments:

Post a Comment