।। गुलमोहर फुलला ग्रीष्मात ।। ************************* नव्हते काही मनात गवसले ते क्षणात चांदणे जसे शीतल अवतरले भर उन्हात..!!
आले समोर मार्गात लावण्य रत्न साक्षात लुब्ध मी पाहताच घायाळ त्या कटाक्षात..!!
अमोघ तेज मुखड्यात भास्कर झोकाळाला त्यात शीतल झुळूक वाऱ्याची होती तीच्या पदरात..!!
मोद तिच्या भेटण्यात वसंत रुजला मनात अंथरले ह्रदय पायात गुलमोहर फुलला ग्रीष्मात...!! ******सुनिल पवार........
No comments:
Post a Comment