Tuesday, 7 April 2015

।। तमा ।।

:::।।तमा ।।:::
************
का बाळगशी अंधाराची तमा..
बांध नव्याने आयुष्याचा समा..
जगी नसतो कोणीच कोणाचा..
कशास धरावे मग कोणा जमा..!!

शीते तेथे भूते जमती..
ऐश्वर्यात इथे सारेच रमती..
नसतो कोणी साथी संगती..
त्याच चुली अन तीच माती..!!
का द्यावा मग दोष नशिबाला..
का कोसावे असे दैवाला..
मनुष्य जन्म हा पुण्याईचा..
भाग्यवान तो, मिळे ज्याला..!!
बुद्धि बळ तुज सारे असता..
मनगटात तुझ्या जोर असता..
का गाळावे मग हात पाय..
का म्हणावे दे ग माय..!!
भर पंखात बळ जिद्दीचे
घे भरारी नव्या दमाने..
इच्छा तेथेच मार्ग असतो
गाठ शिखर तू नवे श्रमाने..!!
********सुनिल पवार.....

No comments:

Post a Comment