Thursday, 4 April 2019

उत्तर..

उत्तर..
तसं
सहजासहजी कधीही
मी तुला 
नाहक प्रश्नात गुंतवलं नाही..
केलाच असेल कधी प्रश्न
पण त्याचंही,
उत्तर अजून आलं नाही..!!
तू सबब सांगते दरवेळी
मी संभ्रमित होतो त्या त्या वेळी
अन् प्रश्न माझ्या मनास पडतो
पण त्याचंही,
उत्तर अजून मिळालं नाही..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment