चित्र विदीर्ण..
पावला पावलावर
मला दिसलेले..
निष्पर्ण झाड
सावलीस मुकलेले..!!
निष्पर्ण झाड
सावलीस मुकलेले..!!
पातेऱ्याचा खच
किती वाढलेला..
परागंदा हिरवळ
जिवाणू दडलेला..!!
किती वाढलेला..
परागंदा हिरवळ
जिवाणू दडलेला..!!
वाकलेले झाड
बुंध्यावर विसावलेले..
गिधाडांचे थवे
त्यावर बसलेले..!!
बुंध्यावर विसावलेले..
गिधाडांचे थवे
त्यावर बसलेले..!!
तप्त पाऊलवाट
लोक चाललेले..
नजरेत आकाश
मार्ग चुकलेले..!!
लोक चाललेले..
नजरेत आकाश
मार्ग चुकलेले..!!
विशाल पाणवठा
झरा आठलेला..
चित्र विदीर्ण
कंठ दाटलेला..!!
**सुनिल पवार...✍🏽
झरा आठलेला..
चित्र विदीर्ण
कंठ दाटलेला..!!
**सुनिल पवार...✍🏽

No comments:
Post a Comment