एप्रिलफूल..
तसा नेहमीच
मी एप्रिल फुल होतो
स्वप्नांच्या झुल्यावर झुलतो,
मनाचा मनोरा हेलकावे खातो
अन् नकळत तुटून जातो
त्याच तुटलेल्या झुल्याचा
केवळ मीच साक्षीदार असतो
तुला ते कळतच नाही
अन् मीही ते दाखवत नाही..!!
मी एप्रिल फुल होतो
स्वप्नांच्या झुल्यावर झुलतो,
मनाचा मनोरा हेलकावे खातो
अन् नकळत तुटून जातो
त्याच तुटलेल्या झुल्याचा
केवळ मीच साक्षीदार असतो
तुला ते कळतच नाही
अन् मीही ते दाखवत नाही..!!
आता तर काय
तुला निमित्तच आहे
तू खेळत राहा तुझा खेळ
त्यातच घालावं तू वेळ
मी फारकत घेतलीय स्वप्नांशी
अन् थडगे बांधलेय मनोऱ्याचे
सजवली आहेत
त्यावर आठवणींची फुलं
तुझं चालू दे
एप्रिलफूल, एप्रिलफूल..!!
***सुनिल पवार...✍️
तुला निमित्तच आहे
तू खेळत राहा तुझा खेळ
त्यातच घालावं तू वेळ
मी फारकत घेतलीय स्वप्नांशी
अन् थडगे बांधलेय मनोऱ्याचे
सजवली आहेत
त्यावर आठवणींची फुलं
तुझं चालू दे
एप्रिलफूल, एप्रिलफूल..!!
***सुनिल पवार...✍️

No comments:
Post a Comment