Thursday, 4 April 2019

सत्य...

काही
लपवायचं असतं त्याला
म्हणून तो
सरळ रस्त्यावरूनही
वळण शोधत जातो!

अन् मग कधीतरी

एखाद्या वळणावर तोंडघशी पडतो!!

                                           
पण त्याला हे कळत नाही की
काळ्या ढगांच्या मुठीत
सूर्य झाकता येत नाही!
किंवा डोंगराच्या मागेही
तो दडवता येत नाही!!


‘सत्य’ हेच आहे की
त्याचे अस्तित्व
कधी ना कधी

जगासमोर
उभारून आल्याशिवाय
राहत नाही!!

**सुनिल पवार..✍️

No comments:

Post a Comment