Monday, 10 October 2016

|| आम्ही ||


|| आम्ही ||
=======
आम्ही जगतो बेफाम
गुल गुलशन गुलफाम..
आम्ही वागतो मस्तवाल
प्याल्यातून ओसांडतो जाम..!!


आम्ही वापरतो खुशाल
साम दाम दंड भेद..
आम्ही लपवितो स्वार्थ
दाखवीत जगास खेद..!!

आम्ही खेळवतो खेळ
जातीयतेच्या अंगणात..
आम्ही लोळावतो एकेकास
भावनेच्या रणांगणात..!!

आम्ही दर्शवितो मात्र
जगी सर्व समान..
आम्ही ठेवितो नेहमीच
माणूसकीस गहाण..!!

आम्ही भासवतो सर्वांस
सुंदर, शीतल, चारित्रवान..
आम्ही जपतो मनात
वक्रदृष्टी, अहंम, दुराभिमान..!!

आम्ही म्हणतो गर्वाने
जय महाराष्ट्र, जय शिवराय..
आम्ही जाणतो कुठे
कोणी अर्थ सांगेल काय..??
*****सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment