Tuesday, 4 October 2016

|| गोट्याच्या कविता || # 02 (व्हाट्सअप बाबा)

|| गोट्याच्या कविता ||
==============
# 02 (व्हाट्सअप बाबा)
गोट्या तसा
बुवाबाजीच्या विरोधात
पण व्हाट्सअप बाबाचा
अनन्य भक्त
त्याच्याच कृपेने
म्हणतात
गोट्यास बरकत आली..
त्याने लिहले गद्यात
पण त्यातही
पद्याची हरकत आली
प्रसिद्धी
गोट्याकडे सरकत आली..
अन गोट्याची
सर्वत्र (ग्रुपवर)
वाह वा झाली..!!
II जय व्हाट्सअप बाबा II
***सुनिल पवार...

No comments:

Post a Comment