|| कागद/लेखणी ||
===========
तिच्या मौनाचा संवाद
त्याने केलाय आत्मसात..
तिच्या ओघळणाऱ्या अश्रूस
त्याने सामावलंय हृदयात..!!
तिच्या सुखात दुखाःत
निरंतर त्याची साथ..
तिची प्रत्येक भावना
त्यानेच मांडली शब्दात..!!
सचैल न्हाहतो तो
तिच्या प्रेमाच्या प्रवाहात..
विहंग विहारतो तो
तिच्या स्वप्नांच्या उत्तुंग आकाशात..!!
टंकार असतो तो
तिने उगारल्या आसुडाचा..
झंकार होतो तोच
तिने गुंफलेल्या भावनांचा..!!
तिचा शब्द झेलायला
तो नेहमीच दिसतो तत्पर..
नाभीतली कस्तुरी ती
तो दरवळणारे अत्तर..!!
युगायुगांची ही त्यांची
निस्सीम प्रेम कहाणी..
तो प्रियकर वेडा कागद
ती सुंदर प्रियतमा लेखणी..!!
===========
तिच्या मौनाचा संवाद
त्याने केलाय आत्मसात..
तिच्या ओघळणाऱ्या अश्रूस
त्याने सामावलंय हृदयात..!!
तिच्या सुखात दुखाःत
निरंतर त्याची साथ..
तिची प्रत्येक भावना
त्यानेच मांडली शब्दात..!!
सचैल न्हाहतो तो
तिच्या प्रेमाच्या प्रवाहात..
विहंग विहारतो तो
तिच्या स्वप्नांच्या उत्तुंग आकाशात..!!
टंकार असतो तो
तिने उगारल्या आसुडाचा..
झंकार होतो तोच
तिने गुंफलेल्या भावनांचा..!!
तिचा शब्द झेलायला
तो नेहमीच दिसतो तत्पर..
नाभीतली कस्तुरी ती
तो दरवळणारे अत्तर..!!
युगायुगांची ही त्यांची
निस्सीम प्रेम कहाणी..
तो प्रियकर वेडा कागद
ती सुंदर प्रियतमा लेखणी..!!

No comments:
Post a Comment