Friday, 28 October 2016

|| भाव शुभेच्छांचे ||

|| भाव शुभेच्छांचे ||
============
दारावर टांगलेल्या कंदीलात,
उजेडाचा अभाव आहे..
अवसेला न भेटण्याचा,
चंद्राचा स्वभाव आहे..!!

रोषणाई लख्ख दिव्यांची,
उजळला सारा गाव आहे..
तिमारातल्या उत्सवावर
चांदण्यांचा प्रभाव आहे..!!
रांगोळीतले रंग उडाले,
केले जसे घुमजाव आहे..
गेरूच्या या छाताडावर,
कोरले माझे नाव आहे..!!
भासतो तसा उत्साही मी,
बेमालूम परी बनाव आहे..
माझ्या मनाच्या दीपावलीत,
शुभेच्छांचेच भाव आहेत..!!
****सुनिल पवार...✍🏽

No comments:

Post a Comment