Showing posts with label हास्य कविता. Show all posts
Showing posts with label हास्य कविता. Show all posts

Wednesday, 29 July 2020

मुझमे अभी तू ज़िंदा है..

मुझमे अभी तू ज़िंदा है..
मुझमें अभी तू ज़िंदा है
पर वक्त एक परिंदा है।
कब उड़ जाएगा पता नही
वैसे मेरा कोई इरादा नही।
हो सके तो रोककर रखना
कुछ पल सँजोगकर रखना।
क्यों कि, गुजरा वक्त
कभी आता नही
और सिर्फ यादों के सहारे
गुजारा होता नही।
--सुनील पवार..✍️
573
People Reached
28
Engagements
20
2 Comments
5 Shares
Like
Comment
Share

Monday, 24 October 2016

|| उचकी ||

चला थोडे हसवू
अन थोडे हसु..
मनाच्या चकव्यात..
अलगद फसु..!!
=D ====== =D
|| उचकी ||
=======
😄😜😄
उचकीची फ्रिक्वेन्सी
वाऱ्याच्या लहरीवर
स्वार होऊन येते..
अन..
स्मृतीच्या कॅमेऱ्यात
मनाच्या फाईलीत
चित्रफीत सुरु होते..

शाशंक मन
सतत प्रश्न विचारले
ही का ती..का ती..??
च्यामारी
नक्की कोण
आठवण काढते..
उचकी लागली की,
आमचं हे असं होते..!!
***$p..✍🏽
😄😜 

Monday, 17 October 2016

|| निव्वळ टाईमपास ||

|| निव्वळ टाईमपास ||
==============
😜😄😜😄
ती : अरे किती दिवसांनी..?
काय..! कसा आहेस..?
तो : कसा असणार..?
वाळवंटात नाही पाण्याचा लवलेश..!!
😄=====😄
ती : हम्म, तरीही..
पण काही तरी असेल ना विशेष..?
तो : हो, आता उरलेत मागे
मोजकेच अवशेष..!!
😜=====😜
ती : अच्छा..म्हणजे
काहीतरी आहे तर शेष..
तो : म्हटलं तर हो
पण शाश्वती नाही,
कधी होतील निःशेष..!!
😄=====😄
ती : का ओसरला रे
इतक्यात उन्मेष..?
तो : जळून गेला केव्हाच
तो नजरेतला द्वेष..!!
😜=====😜
ती : काळजी नको,
आता धूसर झालीय रेष..
तो : हो, पण ओलांडून झालीय ना
कधीची वेस..!!
😄=====😄
ती : मग बघ माझ्याकडे
अन बदलून घे तुझा वेष..
तो : केव्हाच बदललाय, उतरवलं तारुण्य,
लपवले कळपात पांढरे केस..!!
😩=====😩
ती : हम्म, चल मी निघते,
बरीच काम आहेत शेष..
तो : बरं..भेटत जा अधून मधून,
पाठव व्हाट्सअप वर संदेश..!!
*****$p.....✍🏽😄 


Monday, 26 September 2016

|| गोट्याच्या कविता || # 01 (अचंबित)




साहित्य, साहित्यिक आणि
|| गोट्याच्या कविता ||
==============
# 01 (अचंबित)
==============
गोट्या आला
अन
चार चौघात
चक्क शिंकला
काय आश्चर्य
रुमालाचा खच पडला
हैराण गोट्या
च्यामारी
शेंबूड गळला
का
मध ठिबकला..?
**$p..

Wednesday, 21 September 2016

|| पुरस्कार ||

|| पुरस्कार ||
========
रोजच भरतो साहित्य दरबार
पण अजब त्याचा कारभार..
तर्क शून्य ते सारे व्यवहार
झाले उदंड पुरस्कार..!!

फडफडतो कुठे कागद कोरा
त्यास, वाहत्या वाऱ्याचा आधार..
रांगू लागले बाळ जरासे
मिळवी जीवन गौरव पुरस्कार..!!
एकमेकांची पाठ खाजवू
असे अलिखित ठरलेले करार..
वजन वाढवता कागदाचे ते
खुलते पुरस्काराचे द्वार..!!
मलिन सारे आरसे मनाचे
जगा,काय छबी दिसणार..?
दिवा दावितो प्रकाश जगास
बुडाखाली त्याच्याही अंधार..!!
****सुनिल पवार...✍🏽 

Thursday, 1 September 2016

II कवी II

II कवी II
======
कवी झाले स्वस्त
टीका चाललीय मस्त..
सून म्हणते गरीब मी
सासूच भारी खाष्ट..!!


शब्द बिचारे दुरापास्त
कर्ण झाले त्रस्त..
गदारोळ हा भावनांचा
न संपणारी ती गोष्ट..!!

लिहा की बिनधास्त
नको अपेक्षा जास्त..
लोक म्हणतात बा
तो कवी लै जबरदस्त..!!
****सुनील पवार..... 😄😜

II हे देवा II


II हे देवा II
=======
देवास मी म्हणालो...
:
हे देवा, जाण तू माझी *आकांक्षा*
ठाऊक असेलच तुला *मनीषा*
दाखव मजला एक सुंदर *दिशा*
तुझ्याच कृपेने बहरते *सृष्टी*
लाभावी मज तुझी कृपा *दृष्टी*..!!
:
देव म्हणाला..
:
कळतेय मला तुझी *अभिलाषा*
सोडू नकोस कधीच *आशा*
असेल जर जवळ सबुरी *श्रद्धा*
तर मिळवशील तुझी तूच *दिशा*...!!
*****$p...✍🏽😀

Monday, 15 August 2016

|| पंच(क) नामा ||


|| पंच(क) नामा ||
============
पाच तऱ्हेचे पाच
तू नाच बेटा नाच..!!
ठेंगा दाखवे अंगठेबाज
जरा समजून घे अंदाज
निराळाच परी त्याचा बाज
तू बारकाईने वाच..
पाच तऱ्हेचे पाच
तू नाच बेटा नाच..!!
दर्शवे काय ती तर्जनी
ऐक जरा तिची वाणी
गुण दोषांची महाराणी
भासे आरस्पाणी काच..
पाच तऱ्हेचे पाच
तू नाच बेटा नाच..!!
दृष्टी तिची उंच भारी
ती मध्यका भली बिचारी..
विनयशील दिसे विचारी
जणू जाणते खळगे खाच..
पाच तऱ्हेचे पाच
तू नाच बेटा नाच..!!
म्हणतात तिज अनामिका
नाव तीला ठेवू नका
चालविते आपलाच हेका
लुडबुडते उगाच..
पाच तऱ्हेची पाच
तू नाच बेटा नाच..!!
करंगळी रणभेरी तुतारी
इवली परी बलवान भारी
भल्या भल्यांची उडे भंबेरी
मारताचं ती टाच..
पाच तऱ्हेची पाच
तू नाच बेटा नाच..!!
****सुनिल पवार....😜

|| झोल ||

|| झोल ||
😜==😜
जितकी तोंडे
तितके बोल..
कसले उथळ
अन काय खोल..
कसबी खरा
तो वाजपी अनमोल..
अन्यथा वाजवा डबे
वा बडवा ढोल..!!

तर्कांचा तराजू
दोलायमान नेहमी..
कसली हामी
अन कसला कमी..
हुकमाचा एक्का
नेहमीच कामी..
नफ्याचा सौदा
अन काट्यात झोल..!!
शिवशिवतात हात
दाखवतात बोट..
कसली उणीव
अन कसली खोट..
उग्र दर्पाची
बांधली मोट..
नाकाची उगाच
ती कांदे सोल..!!
जितकी तोंडे
तितके बोल..
कसले उथळ
अन काय खोल..!!
*****$p*****

|| कवी ते कवी ||

|| कवी ते कवी ||
😜=======😜
कवीला जात नसते म्हणतात
पण भेद मात्र आहे..
प्रस्थापित अन नवोदित
अस न भरणारं पात्र आहे..!!

काय निकष असतील बरे
प्रस्थापित अन नवोदितात..?
प्रश्न तसा वृथाच आहे
सत्य मात्र शब्द दाखवितात..!!
कैक कवींना पाहिले वाचले
भेद न मला तसे दिसले..
शब्द कमी कोंडाळे जास्त
नामवंत मध्ये होते बसले..!!
अनुभवाचा जरी वानवा
शब्द पेटवितात तरी वणवा..
उलघडे हळुवार कप्पे मनाचे जो
तोच खरा जनमनात जाणावा..!!
तुम्ही माना अथवा
मानू नका
किंतु मनात आणू नका..
दिसले तसेच मांडले
कवींनो
उगाच भुवई ताणू नका..!!
😜😀😜😀😜😀
****सुनिल पवार....

Wednesday, 20 July 2016

|| लाईमलाईट ||

|| लाईमलाईट ||
===========
काल आमच्या कपिलेला
कालवड झाली..
बातमी तीनं
व्हाट्सअपवर टाकली
समदी गुरं जमून आली
आनं
शुभेच्छांची मांदियाळी झाली..!!

म्या म्हणलं कपिलेला
बरं जमतंय तुला..
काय म्हणत्यात ग ह्याला..??
तर ती म्हणली मला
तुला न्हाय समजणार
"लाईमलाईट" म्हणत्यात त्याला
जपावं लागतंय बघ स्टेटसला..!!
म्या म्हणलं तिला
पण उपेग काय ग त्याचा
ते येणार व्हय बाराश्याला..??
तर म्हणली ती
नाय बा,
पण लै अप्रूप असतंय बघ
हवशा, नवश्या गवश्याला..!!
शेजारच्या ढवळ्याचा
आजच बा खपला
तर त्यानं आधी
स्टेटस अपडेट केला..
म्या म्हणलं,
आरं आदूगर पोचीव बा ला
तर म्हणला त्यो
मंग साले हो
सांगा तुम्ही कशाला..??
म्या म्हणलं,
आम्ही आहोतच रं
पण निदान
दुःख दाखीव तरी जगाला
म्हणला त्यो,
तेच तर करतोय..
रडल्याची स्मायली टाकतोय
बघ ना जरा डोळे फाडून
जो तो कसा
श्रद्धांजली वाहतोय..!!
म्या म्हणलं,
आरं पण उपेग काय त्येचा
येणार हाईत का ते
तुझ्या बा ला पोचवायला..??
म्हणला त्यो न्हाई
पण स्टेटस हवं जपायाला
समजायचं न्हाय गड्या तुला
लाईम लाईटमंदी हवं ऱ्हायाला..!!
****सुनिल पवार....😜

Tuesday, 21 June 2016

|| कंत्राट ||

😄हसना मना है😄
=============
|| कंत्राट ||
😜😄😜
खुर्चीत रेलून
आधुनिक सत्यवान
शांतपणे
पेपर वाचत होता..
सावित्रीची
लगबग सारी
डोळ्यांच्या कोनातून
न्याहाळत होता..!!

ही नेसु का ती नेसु
प्रश्न मधेच
पडत होता..
डावा डोळा
सत्यवानाचा
सारखा सारखा
फडफडत होता..!!
झाला एकदाचा
शृंगार
नाकात नथ
हातात चुडा
गळ्यात
मंगळसूत्र रत्नहार..
निघाली सावित्री
वडाकडे
हुश्श्
संपला एकदाचा
वारेमाप प्रश्नांचा
भडिमार..!!
निश्चिन्त सत्यवान
घड़ीभर
मोकळा श्वास
घृतो न घेतो तोच
सावित्री
पुन्हा हजर..
शंकेची पाल
चुकचुकली
अन्
कावरी बावरी
झाली
सत्यवानाची नजर..!!
काही बोलणार
सत्यवान इतक्यात
सुरु झालं
धावते समालोचन
वड सावित्रीचे..
कुणाच्या दागिन्यांचे
कुणाच्या सुनेच्या
साडीचे
कुणी काढलेल्या
खोडीचे
अन्
चांगलेच बसले
शालजोडीचे..!!
सरते शेवटी
फर्मान सुटले
सत्यवाना,
पुढच्या खेपेस
त्यांच्यापेक्षा
भारी भारीचे
मला आले पाहिजे..
त्या सटव्यांचे डोळे
चांगलेच
पांढरे झाले पाहिजे..!!
आता
पांढरा पडला
सत्यवान बिचारा
यमाचा धावा
करू लागला..
यम आला पण
तसाच परत गेला
म्हणाला
सत्यवाना,
मी कंत्राट दिलय
आता सावित्रीला..!!
😜😄😜😄
**सुनिल पवार...

Monday, 6 June 2016

**कवी**

**कवी**
=D =========== =D
मी फिरतो खुलेआम
शब्दांच्या सोबतीने..
अस्त्र का शस्त्र
लोक म्हणतात भीतीने..!!
=D *************** =D
स्फुरण चढले मला
मी सर्वांस नडू लागलो..
कधी भावनिक ब्लॅकमेल
कधी वाभाड़े काढू लागलो..!!
=D **************** =D
खुशमस्कऱ्यांची करून गैंग
मी गर्वाने फिरू लागलो..
लोण्यावर ठेवून डोळा
मी सावज नवे हेरु लागलो..!!
=D **************** =D
आता दादा म्हणतात लोक मला
माझाही ग्रह तसाच झाला..
कळेना कधी,कवी बदनाम झाला
पाहुन जो तो पळु लागला...!!
=D **************** =D
***चकोर***

Monday, 9 May 2016

|| सांगा की राव ||

|| सांगा की राव ||
=◆=◆=◆=◆=◆=
प्रश्न पडलाय मला
उत्तर तुम्ही सांगावं
कंच्या कंच्या ग्रुपवर
म्या किती बोलावं..!!

कळना काय बी
कुठं मौन खोलावं
वाजतेय बघा बिन
म्या किती डोलावं..!!
सकाळी का सांजच्याला
कवा ईप्सित साधावं
नेमकं कंच्या येळस
कंच्या देवास स्मराव..!!
देवा की हो सल्ला
म्या काय करावं..
भ्या वाटतंय मला
उगा कोणास बाधावं..!!
😄😊😜
***सुनिल पवार...

Wednesday, 9 March 2016

|| मी, ती अणि महिला दिन ||

 || मी, ती अणि महिला दिन ||
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
मी :
झाला का ग,
तुझा महिला दिन..?
ती :
रोजच असते की हो,
महिला दीन..!!
मी :
तुझं आपलं काही तरीच
बघ अधूरा मी तुझ्यावीन..
ती :
आता उगाच वाजवू नको
पोकळ शब्दांची बीन..!!
मी :
मी खरं तेच बोलतोय
तुझा शब्दंशब्द झेलतोय
ती :
म्हणजे तसंच ना?
इकडून ऐकायचं
अन् तिकडून सोडायचं..?
आणि मी आपलं मागे,
कोकलत राहायचं..!!
मी :
तुला वाटतो तसा,
मी मुळीच नाही
तुझ्या शिवाय माझं,
पानही हलत नाही..
ती :
तुला वाटते तशी,
मी ही नाही
तुझा साळसुदपणाचा आव
समजू नको कळत नाही..!!
मी :
बरं बाई मी माघार घेतो
आहे महिला दिन
घेतलं पटवून
नव्हे नव्हे पटलेच मला..
ती :
मानावेच लागेल तुला
नाही तर,
पेटणार नाही घरचा चूल्हा..!!
मी :
बरं....
पुरुष दीन असतो का ग..??
मला वाटतं रोजच असावा..
ती :
मलाही वाटतंय राजा,
पुरुष दिन असावा
त्या दिवशी त्याने,
आमचा हट्ट पुरवावा..!!
मी :
निशब्द.....
***सुनिल पवार..✍️😉