Wednesday, 9 March 2016

|| मी, ती अणि महिला दिन ||

 || मी, ती अणि महिला दिन ||
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
मी :
झाला का ग,
तुझा महिला दिन..?
ती :
रोजच असते की हो,
महिला दीन..!!
मी :
तुझं आपलं काही तरीच
बघ अधूरा मी तुझ्यावीन..
ती :
आता उगाच वाजवू नको
पोकळ शब्दांची बीन..!!
मी :
मी खरं तेच बोलतोय
तुझा शब्दंशब्द झेलतोय
ती :
म्हणजे तसंच ना?
इकडून ऐकायचं
अन् तिकडून सोडायचं..?
आणि मी आपलं मागे,
कोकलत राहायचं..!!
मी :
तुला वाटतो तसा,
मी मुळीच नाही
तुझ्या शिवाय माझं,
पानही हलत नाही..
ती :
तुला वाटते तशी,
मी ही नाही
तुझा साळसुदपणाचा आव
समजू नको कळत नाही..!!
मी :
बरं बाई मी माघार घेतो
आहे महिला दिन
घेतलं पटवून
नव्हे नव्हे पटलेच मला..
ती :
मानावेच लागेल तुला
नाही तर,
पेटणार नाही घरचा चूल्हा..!!
मी :
बरं....
पुरुष दीन असतो का ग..??
मला वाटतं रोजच असावा..
ती :
मलाही वाटतंय राजा,
पुरुष दिन असावा
त्या दिवशी त्याने,
आमचा हट्ट पुरवावा..!!
मी :
निशब्द.....
***सुनिल पवार..✍️😉

No comments:

Post a Comment