Wednesday, 23 March 2016

|| समयसुचकता ||

|| समयसुचकता ||
=■◆=◆=■=◆=◆=
आमचे चिरंजीव रूद्र (इयत्ता ७ वी) रात्री आम्ही जेवत असता..म्हणाले...आई आज ना बाजारात मी सायकल घेऊन स्लीपर बघायला गेलो.(आमच्या ईथे दर रविवारी आठवडा बाजार भरतो..मी त्याला गमतीने मथुरेचा बाजार म्हणतो) .तिथे दोन मोठी मुले अली..आणि मला म्हणाली...ये आम्हाला सायकलचा एक राउंड दे ना..मी म्हणालो सायकल माझी नाही माझ्या मित्राची आहे..यावर ते म्हणाले कुठे आहे तुझा मित्र..?? चल दाखव..मी म्हणालो त्या बाजूला पलीकडे आहे..मग ते पुन्हा म्हणाले खोटे बोलू नको..आम्ही पाहिलयं तुझ्या बरोबर कोणी नाही..सायकल दे नाहीतर मार खा..
त्याच्या त्या बोलण्याने आईने म्हणजे आमच्या सौ. ने काळजीयुक्त स्वरात विचारले..कोण होते ते..मारले का त्यांनी तुला..?? यावर रूद्र म्हणाला..ते कसले मारतात मला..उलट घाबरून पळून गेले..ते कसे काय..?? मधेच साक्षीने उत्सुकतेने विचारले..(साक्षी माझी मोठी मुलगी) तिच्या प्रश्नावर रूद्र उत्तरला..मित्र नसला म्हणून काय झाल..आई आहे ना..! आईच नाव काढताच ते घाबरले...तरी धीर करून ते म्हणाले कुठे आहे आई..?? दाखव आम्हाला..मी लगेच बाजूच्या बायकांच्या घोळक्याकड़े हात दाखवला...आणि जोरात हाक मारली...ये आई हे बघ माझी सायकल जबरदस्तीने मागत आहेत..असं बोलत त्या घोळक्याकड़े वळलो...आणि ते दोघे मागच्या मागे पळाले.. मग मी अरामात घरी आलो..
इतके ऐकून आमच्या सौ. चा जीव भांड्यात पडला..ती रुद्राला म्हणाली..पुन्हा जाऊ नको तिकडे एकटा..यावर तो बेफिकिरपणे म्हणाला..काही होत नाही..तू उगाच घाबरतेस..मी पाहिलय त्यांना कुठे राहतात ते..त्याचे ते उद्गार ऐकून आमच्या सौ..माझ्याकड़े एक सूचक कटाक्ष टाकून वदल्या.. पोरगा बापासारखा अवली होणार बहुतेक..मी गुपचुप मुलीकडे पाहिले आणि मुकाट ख़ाली मुंडी घालून पाताळ धुंडू लागलो..म्हणजेच जेवू लागलो..
**धन्यवाद**
****सुनिल पवार...

No comments:

Post a Comment