|| नागडेपण ||
=◆=◆=◆=◆=
किती मुक्त भासतोस रे
तू मोकळ्या आकाशात..
डोळे दिपुन जातात
तुझ्या त्या दिव्य प्रकाशात..!!
=◆=◆=◆=◆=
किती मुक्त भासतोस रे
तू मोकळ्या आकाशात..
डोळे दिपुन जातात
तुझ्या त्या दिव्य प्रकाशात..!!
भुलून जाते मन
वाटते पुन्हा पुन्हा पहावे..
तुझ्या अफाट अकलनाचे
आकाश कवेत घ्यावे..!!
तुझ्या त्या अद्वितीय कलाबाजीस
वाटले आपणही शिकावे..
ह्या विस्तृत नाभांगणात
आपलेही अस्तित्व तसेच टिकावे..!!
पण दिखाऊच निघाली रे
तुझी ती सारी कलाबाजी..
संभ्रमित संमोहीत जादू
अन बुरख्यातील दगाबाजी..!!
वारंगणेला शोभेल असाच
तू रंग पोतुन आलास
एकटे दुकटे सावज हेरून
तू हातवारे करून गेलास..!!
कळून चुकले मला आता
भंपक होते तुझे ते
चार चौघातले रांगडेपण..
अन दिसून आले तेच पुन्हा
तुझे बंद दारातले नागडेपण..!!
******सुनिल पवार....
वाटते पुन्हा पुन्हा पहावे..
तुझ्या अफाट अकलनाचे
आकाश कवेत घ्यावे..!!
तुझ्या त्या अद्वितीय कलाबाजीस
वाटले आपणही शिकावे..
ह्या विस्तृत नाभांगणात
आपलेही अस्तित्व तसेच टिकावे..!!
पण दिखाऊच निघाली रे
तुझी ती सारी कलाबाजी..
संभ्रमित संमोहीत जादू
अन बुरख्यातील दगाबाजी..!!
वारंगणेला शोभेल असाच
तू रंग पोतुन आलास
एकटे दुकटे सावज हेरून
तू हातवारे करून गेलास..!!
कळून चुकले मला आता
भंपक होते तुझे ते
चार चौघातले रांगडेपण..
अन दिसून आले तेच पुन्हा
तुझे बंद दारातले नागडेपण..!!
******सुनिल पवार....

No comments:
Post a Comment