Wednesday, 30 March 2016

|| प्रश्न ||

|| प्रश्न ||
◆◆==◆◆
प्रश्नासही प्रश्न पडावा
प्रश्न तो कुठे निपजतो..
प्रश्नाभोवती प्रश्न तसाच
मग घिऱट्या मारीत राहतो..!!

मी पाहतो मनाच्या चक्षुतुन
त्या प्रश्नाचा झुकलेला कल..
प्रश्न तोच दूषित करतो
नाहक मुडद्याची उकल..!!

करू पाहतो मी अभ्यास
त्या प्रश्नाच्या जनकचा..
म्हणूनच जमा करतो नमूना
त्याच प्रश्नांच्या जनुकांचा..!!

अनुमान निघते ढोबळ
निराळे अराखड़े बांधतो
जुन्यात मिसळून नवे काही
समन्वय प्रश्नातून साधतो...!!

अनुत्तरीत राहतो प्रश्न तरीही
नित्य नवे प्रश्न घेऊन येतो..
प्रश्नांची उकल करता करता
त्या प्रश्नांचा मी होउन जातो..!!
*******सुनिल पवार......

No comments:

Post a Comment