|| शब्दांच्या फाफट पसाऱ्यातुन ||
=◆=◆=◆=●=◆=◆=◆=◆=◆=
चाळत बसलोय
एक एक शब्दाला
त्याच शब्दांच्या
फाफट पसाऱ्यातुन..
एक एक शब्द
होता बरबटलेला
दिखाव्याच्या गिलाव्यात
होरपळलेला मत्सरात
कवळलेला काट्यातून
कुठे डबडबलेला
स्वार्थाच्या भावनेतुन..!!
=◆=◆=◆=●=◆=◆=◆=◆=◆=
चाळत बसलोय
एक एक शब्दाला
त्याच शब्दांच्या
फाफट पसाऱ्यातुन..
एक एक शब्द
होता बरबटलेला
दिखाव्याच्या गिलाव्यात
होरपळलेला मत्सरात
कवळलेला काट्यातून
कुठे डबडबलेला
स्वार्थाच्या भावनेतुन..!!
झरतोय अलवार
एक एक शब्द
विलग होतोय
मनापासुन मनापर्यंत
कोरडा होऊन
सजतोय पुन्हा
निखरतोय
स्थितप्रद सन्यस्त
वैराग पोतुन..!!
काळजी घेतोय
तशीच आता
न सुटावा
एकही शब्द
गुरफ़ड़ून भावनेत
लपून छपुन
श्रीखंडी सारखा
न वेध घ्यावा
पुन्हा कोणाचा
कोणा अर्जुनामागून
न सुटावा
तसाच बाण
पुन्हा भात्यातून..!!
****सुनिल पवार.....
एक एक शब्द
विलग होतोय
मनापासुन मनापर्यंत
कोरडा होऊन
सजतोय पुन्हा
निखरतोय
स्थितप्रद सन्यस्त
वैराग पोतुन..!!
काळजी घेतोय
तशीच आता
न सुटावा
एकही शब्द
गुरफ़ड़ून भावनेत
लपून छपुन
श्रीखंडी सारखा
न वेध घ्यावा
पुन्हा कोणाचा
कोणा अर्जुनामागून
न सुटावा
तसाच बाण
पुन्हा भात्यातून..!!
****सुनिल पवार.....
No comments:
Post a Comment