Sunday, 20 March 2016

II चिमणी II

**समस्त चिमण्यांना चिमणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा**
========
II चिमणी II
========
सिमेंटच्या जंगलातून
चिमणी उडाली भुर्र भुर्र..
साद घालते पहाट
तिचा हरवला सुर..!!

घास खोळंबला चिऊचा
टिपेना कोणी दाणा..
कुठे गेली चिऊ ताई
बाळ मलूल केविलवाणा..!!
ये गं ये गं चिऊताई
माय बोलावी अंगणी..
बाळा रिझवण्या मना
आर्त गात असे ती गाणी..!!
साद ऐकली चिऊने
आली परातोनी घरी..
पहाट प्रसन्न हसली
चिवचिव चिवट भारी..!!
*******सुनिल पवार.....

No comments:

Post a Comment