Wednesday, 16 March 2016

II तू अन मी, मी अन तू II

II तू अन मी, मी अन तू II
================
तू काही दिले नाही अन
मी काही घेतले नाही..
एकमेका पूरक आपण
हिशोब करणे बरे नाही..!!


माझे तेच तुझे अन
तुझे तेच माझे समज..
उघड डोळे समजून घे
आपल्या परक्याची उमज..!!

वाचाळलेल्या त्या वस्तीत
तू शब्दांचा कीस पाडू नको..
अर्था अनर्थाच्या ताटात
दुखाःस नाहक वाढू नको..!!

समजून घे माझे प्रयास
लावू नको नुसतेच कयास..
तुझे सुख हाच एक ध्यास
कळेल तुजही,
जर ठेवशील विश्वास..!!
*****सुनिल पवार.....

No comments:

Post a Comment