Friday, 4 March 2016

II समजू नको मज II

II समजू नको मज II
=============
तुझ्या दर्शना
मी अभिलाषी..
समजू नको मज
विषय विलासी..!!


गौर कांती तुझी
मदन मंजिरी..
गोड खळी
पड़े गालावरी..
नयन करती ग
मखलाशी..
समजू नको मज
विषय विलासी..!!

केश फुलोरा
झुले कटीवरती..
नागीण डुले
जशी बांधावरती..
गुंतले मन
खेळे कुंतलाशी
समजू नको मज
विषय विलासी..!!

अधर पाकळ्या
जळी मासोळ्या..
मोती शिंपती
गुलाब कळ्या..
भ्रमर करितो
गुंज फुलाशी..
समजू नको मज
विषय विलासी..!!

हे प्रेम उत्कट
गहिरे मनाचे..
ते भाव बोलके
क्षणा क्षणाचे..
भुलवी चित्र
मज मदलासी..
समजू नको मज
विषय विलासी..!!
******सुनिल पवार.....

No comments:

Post a Comment