|| एप्रिलफूल ||
🥀=
🥀=
🥀
भर उन्हात बहरते
एप्रिलचे गोंडस फूल..
कल्पनेतल्या रूपड्याची
फसवीच परी झूल..!!
कळेना कुठून रुजते
कुणा लागेना चाहूल..
बेमालूम अवतरते
कुठे वाजेना पाऊल..!!
लांडगा आला रे आला
नुसतीच उठते हूल..
फसवुन तुम्हा आम्हास
निमिषात होते गूल..!!
प्रत्येक मनात रुजतेय
आज एप्रिलचं फुल..
फसवण्याच्या खेळात
झाले सारेच मशगूल..!!
****सुनिल पवार....
✍🏼
😆



भर उन्हात बहरते
एप्रिलचे गोंडस फूल..
कल्पनेतल्या रूपड्याची
फसवीच परी झूल..!!
कळेना कुठून रुजते
कुणा लागेना चाहूल..
बेमालूम अवतरते
कुठे वाजेना पाऊल..!!
लांडगा आला रे आला
नुसतीच उठते हूल..
फसवुन तुम्हा आम्हास
निमिषात होते गूल..!!
प्रत्येक मनात रुजतेय
आज एप्रिलचं फुल..
फसवण्याच्या खेळात
झाले सारेच मशगूल..!!
****सुनिल पवार....


No comments:
Post a Comment