लिहतो कविता तुझ्यासाठी..
लिहतो कविता तुझ्यासाठी
मोह मनाचा आवरत नाही।
तुझे फुललेलं रूप पाहून
मन सावरता सावरत नाही।
तुजसाठीच येती अंबरधारा
नभी फुलतो मेघ पिसारा।
अंग मातीचे गंधाळते अन्
पिसे भरून फिरतो वारा।
तू खेळत राहते वाऱ्यासवे
तो झुलवीत राहतो तुझी फुले।
तू देखणा साज लेऊन घेता
हिरव्या पदारावरती नक्षी झूले।
तुझ्या रूपाचा मोह नभास होतो
तोही सप्तरंग उधळत येतो।
तू रंगात त्याच्या न्हाऊन जाते
तो मोत्याने तुज मढवत जातो।
त्या मोत्यांनाच वेचून आता
मी सर शब्दांची ओवत जातो।
तो थांबला जरी बरसण्याचा
तरी लेखणीतून झरत राहतो।
--सुनील पवार..

No comments:
Post a Comment