काळाच्या ओघात..
काळाच्या ओघात
बरेच बदल घडत गेले।
काही घडत गेले
तर काही बिघडत गेले।
दृश्य गडप झाले
अदृश्य उजेडात आले।
पटणारे रेखत गेले
न पटणारे खोडत गेले।
विचार विरोधात गेले
अविचार प्रवाहात आले।
अद्यातले मध्यात गेले
अन् मध्यातले सध्यात आले।
जितके जवळ आले
तितके अधिक दूर झाले।
तट्टू अडून बसले
अन् गर्दभ चौखूर उधळले।
प्रवाह मिसळत गेले
पण पाट वेगळे पडत गेले।
सुसंस्कृत झाल्या रस्त्यावरून
सगळेच कसे धडपडत गेले।
--सुनील पवार..
No comments:
Post a Comment