Sunday, 14 July 2019

पाठलाग...

पाठलाग..

पाठलाग
मी करतोय की आठवणी
काही कळत नाही!
आणि आठवणीशिवाय 
एकही दिवस ढळत नाही!!

दिवस काय
पण आता रात्रही सरता सरत नाही
अविरत चालू आहे पाठलाग
तो संपता संपत नाही.
आणि हृदयावरचे 
निशेचे साम्राज्य मिटता मिटत नाही..!!
--सुनिल पवार...✍️

No comments:

Post a Comment