मौन....
खुंटलेल्या संवादाचे
मौन बोलके आहे..
किती थोपवशील पाणी
घर गळके आहे..!!
मौन बोलके आहे..
किती थोपवशील पाणी
घर गळके आहे..!!
धूप झालीय खरी
तरी अजूनही चिखल आहे..
ऋतू वाया जाईल
नेत्री हीच सल आहे..!!
तरी अजूनही चिखल आहे..
ऋतू वाया जाईल
नेत्री हीच सल आहे..!!
मधेच डोकावतो कोवळा डिर
परंतु दिसतो न दिसतो..
साचलेल्या तळ्यातुन
जीव घुसमटून जातो..!!
परंतु दिसतो न दिसतो..
साचलेल्या तळ्यातुन
जीव घुसमटून जातो..!!
कुठला बांध फुटतो नकळे
पाणी सारे वाहून जाते..
आकाशही स्वच्छ होते
परंतु मळभ डसून बसते..!!
पाणी सारे वाहून जाते..
आकाशही स्वच्छ होते
परंतु मळभ डसून बसते..!!
रोजच खेळ चालतो
कधी ऊन कधी पाऊस असतो..
इंद्रधनूच्या प्रतीक्षेत
जीव मात्र झुरणीला लागतो..!!
--सुनिल पवार....✍️
कधी ऊन कधी पाऊस असतो..
इंद्रधनूच्या प्रतीक्षेत
जीव मात्र झुरणीला लागतो..!!
--सुनिल पवार....✍️

No comments:
Post a Comment