Sunday, 14 July 2019

मनापासून वाटतं...

मनापासून वाटतं...
मनापासून वाटतं
कधीतरी माझ्या मनाची ओढ
तुझ्या मनाला लागावी..
माझी याचकाची भूमिका
तुझ्या वाट्याला यावी..
मग कळेल तुलाही
याचक होण्याचे
आपले वेगळेच दुःख असते..
अन् दाता होण्याची दानत
सगळ्यातच नसते..
अगदी तुझ्यातही नाही
याचे भान तुला होईल..
पण इतकं मात्र खरं
तुझ्यातला याचक समाधानी राहील..!!
--सुनिल पवार....✍️

No comments:

Post a Comment