Sunday, 14 July 2019

बाबा...

बाबा...
दुधावरची साय असते आई
तर बाबा त्याचे सकस दूध असतो
जितके उकळले तितके चवदार झाले
बाबांनी मुलांस कणखर बनवतो..!!
चटके त्याने स्वतःच खाल्ले
पण डोळ्यात कधी ना पाणी आणले
उकळता दिसतो तो वरून केवळ
पण हृदयातून असतो तितकाच मवाळ..!!
आई सावली असते निर्विवाद
पण बाबा त्या सावलीचं झाड बनतो..
आईच्या विशाल सावलीआडूनच
बाबाही लेकराचे लाड पुरवतो..!!
घराचे घरपण आहे आई
पण बाबा त्याच घराचे छप्पर होतो..
ऊन पावसापासून तोच रक्षण करतो
पाया तोच आणि शिखरही तोच असतो..!!
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

No comments:

Post a Comment