एकांताचा हात धरून..
एकांताचा हात धरून..
बऱ्याच दिवसांनी
रस्ता शांत दिसतोय..
आपल्याच विश्वात
एकांतात रमलेला दिसतोय.!!
कुणी सोबत नाही
कुणाची संगत नाही
मार्ग अगदीच सरळ
कसले वळण नाही..!!
म्हणूनच मी ही चाललोय
एकला चलो रे म्हणत
त्याच रस्त्यावरून..
एकांताचा हात धरून..!!
--सुनिल पवार...✍️
No comments:
Post a Comment