|| मुखी विठ्ठल विठ्ठल ||
केली कायेची पंढरी
आत्मा सखा पांडुरंग..
मन भजनात त्याच्या
असे नित्यनेमे दंग..!!
पाची इंद्रियांचा मेळा
त्याच्या पायाशी जमतो..
माय रखमाई माझी
तिच्या कुशीत खेळतो..!!
मुखी विठ्ठल विठ्ठल
कर्म झाले चंद्रभागा..
कशा बुडतील गाथा
नाही मरण अभंगा..!!
देह नाशवंत जरी
पाडू नकोस विसर..
वारी चालू दे अखंड
श्वास चालतो जोवर..!!
--सुनिल पवार...
446
People Reached
31
Engagements

No comments:
Post a Comment