Monday, 28 April 2014

।। प्रश्न ।।


।। प्रश्न ।।
======
तोच दरवळ असेल का त्या सुमनाला..
का पुसे सवाल मन माझ्या मनाला..!!

गजरा तो अबोल भाळतो कुंतलाला..
का वेड असे त्या नादान फुलाला..!!

कर्णफुले सुरेख शोभती कर्णाला..
का मोह व्हावा ग तसाच  सुवर्णाला..!!

सुरमा काजळी तो भिडतो नयनाला..
का आलिंगतात पापण्या क्षणाला..!!

पाकळ्या गुलाबी चुंबती अधराला..
का गोडवा असावा तोच मकरंदाला..!!

कोणत्या नभाचा रवी भाळी सजला..
कवटाळले असे मी का काळोखाला..!!
******सुनिल पवार....


No comments:

Post a Comment