Thursday, 24 April 2014

II ते एक वय असते II



II ते एक वय असते II

ते एक वय असते ..
नको तेच घडते ..
हृदयाचं पाखरु..
नकळत प्रेमात पडते..!!

ते एक वय असते..
अल्लड अवखळते..
फुलपाखरा परी..
स्वच्छंद बागडते..!!

ते एक वय असते..
स्वप्नाळू मन असते..
इमल्याच्या घरात..
मन अडून बसते..!!

ते एक वय असते ..
भल्या बु-याची जाण नसते..
उथळ प्रेमाच्या..
चकव्यात फसते..!!

ते एक वय असते ..
आंधळे प्रेम असते..
वळण धोक्याचे..
समजून येत नसते..!!

ते एक वय असते ..
वाट काट्याची असते..
हळुवार पाउल..
टाकायचे असते..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment