Monday, 28 April 2014

II प्रेमात सखे II



II प्रेमात सखे II

प्रेमात सखे..प्रश्न का असावे..
विश्वासे घ्यावे..तू कवेत विसावे..!!

क्षण विस्कटले.. आता कसे म्हणावे..
असता तू सवे..का क्षण विस्कटावे..!!

अश्रू मग कैसे..ते मोती बनावे..
ओंजळीत तुझ्या..हास्य फुलावे..!!

श्वास हे तुझे..श्वासात मिसळावे..
स्पंदने कैक जरी..हृदय एक व्हावे..!!

जगावे प्रेमात..तू जीवनी असावे..
दोन जीव सखे..आता एकरूप व्हावे..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment