Thursday, 24 April 2014

II शाळेचे रम्य दिवस II




II शाळेचे रम्य दिवस II

शाळेचे रम्य दिवस..
नाही पुन्हा यायचे..
आठवणीचे क्षण मात्र..
हळुवार जपायचे..!!

रोज तिच्या वाटेवर..
नजर लाऊन बसायचे..
माझ्या मनाच्या प्रश्नात..
पुन्हा मीच फ़सायचे..!!

येता समोर ती..
मागे फिरून परतायचे..
जाता दूर ती..
मागे वाळून पहायचे..!!

सुटता शाळा मग..
नकळत सोबत जायचे..
येता घर तिचे..
मार्ग मी बदलायचे..!!

आज नक्की विचारेन..
मनाशी पक्के ठरवायचे..
साले मांडे खाण्यातच..
दिवस निघून जायचे..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment