Thursday, 24 April 2014

II मिठू मिठू बोल II


II मिठू मिठू बोल II

ती : गुंज तुझे माझे राजा..
दुनयेस सांग कसे कळते..
तो : तू इतकी सुंदर राणी..
सा-यांची नजर इथेच वळते..!!

ती : तुझ्याच नावाचे रे सख्या..
बांधेन मी गळ्यात डोरले..
तो : लाल चटक ओठ तुझे..
काळीज बघ उडू लागले..!!

ती: गोड तुझे शब्द मिठू..
हृदयाशी सख्या लागले भिडू..
तो : दोन हृदय एक करू..
नाव नावाशी आपले जोडू..!!

ती : होईल का रे स्वप्न साकार..
होईल ना रे संसार गोड..
तो : मिठू मिठू बोल राणी..
मिठीत ये चिंता सोड..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment