Monday, 28 April 2014

II नारी II




II नारी II

निर्भय ह्या जगात नरा..
भय असते त्या नारीला..
जाळिती तीज विखारी ज्वाळा..
दोष मात्र तिच्या ज्वानीला..!!

सजवूनी तिज अलंकारात..
तूच लीलया बळी दिला..
वासनेच्या हवन कुंडात..
देह तिचा दहन केला..!!

अमानुष अत्याचार नरा..
युगे तिने सहन केला..
तुझ्याच प्रेमा खातर रे..
मूक मार सहन केला..!!

समजू नको तिज अबला..
आदिशक्ति म्हणतात तीला..
वंदन कर त्या मातेला..
जन्म तुला तिनेच दिला..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment