II आठवणीचा ठेवा II
तुझ्याच आठवणीचा सखे..
बघ जपलाय ग ठेवा..
तू नाकारालेल प्रेम इथे..
आता घेतय ग विसावा..!!
खुडल्या त्या पानात बघ..
अजून आहे तोच ओलावा..
पिकल्या त्या पानाचा सखे..
बघ देठ की ग हिरवा..!!
अचेत पडलंय प्रेम सखे..
तेवतोय ग आशेचा दिवा..
विझवून जाई बघ क्षणात..
तुझ्या प्रेमाची ग ती हवा..!!
उलघडला ग आज अचानक..
आठवणीचा तो अमोघ ठेवा..
अमृत कुंभ हा जतन केला..
संजीवनी देई ग मम जीवा..!!
*चकोर*
तुझ्याच आठवणीचा सखे..
बघ जपलाय ग ठेवा..
तू नाकारालेल प्रेम इथे..
आता घेतय ग विसावा..!!
खुडल्या त्या पानात बघ..
अजून आहे तोच ओलावा..
पिकल्या त्या पानाचा सखे..
बघ देठ की ग हिरवा..!!
अचेत पडलंय प्रेम सखे..
तेवतोय ग आशेचा दिवा..
विझवून जाई बघ क्षणात..
तुझ्या प्रेमाची ग ती हवा..!!
उलघडला ग आज अचानक..
आठवणीचा तो अमोघ ठेवा..
अमृत कुंभ हा जतन केला..
संजीवनी देई ग मम जीवा..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment