Wednesday, 30 April 2014

// मुख चंद्र //




// मुख चंद्र //

रात काळी नभ खाली..
विरह हा मज सहेना..
लक्ष चांदण्या भोवताली..
चंद्रा तुज विन करमेना..!!

वेड लावले मज चंद्राने..
तेजाळ त्या मुखड्याने..
मुख पदराआड लपवता..
चोरटा कटाक्ष टाकणे..!!

कळेना मज तुझे वागणे..
हृदय माझे असे जाळणे..!!
अल्लड लपंडाव खेळता..
नजरेने मग घायाळ करणे..!!

अवचित तुझे लुप्त होणे..
मुश्किल करी माझे जिणे..
अवस भासे मज रात..
सुने सुने सारे तराणे..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment