II ढोंगी साधू II
सोडुनिया आस..
यांनी सोडला संसार..
आचरण उणे..
दिखावाच फार..!!
साव बनोनी जनात..
हळूच उतरती मनात..
कणव ना कोणात..
बिघडली मानव जात..!!
सोडूनी रीत भात..
चाचपडे अंधारात..
पाप पुरते मनात..
गणती सज्जनात..!!
धर्मा आडून सारा..
माजला व्यभिचार..
ढोंगी साधुंचा इथे..
वाढला संचार..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment