Monday, 28 April 2014

II अव्यक्त प्रेम II




II अव्यक्त प्रेम II

अव्यक्त प्रेम माझे..
शब्दात ना बसले..
बसले कधी चुकुन..
प्रेम पुरते फसले..!!

आंधळ्या त्या प्रेमास..
प्रेम ना दिसले....
प्रेमाचे रंग न्यारे..
नजरेत भरून राहिले..!!

रुदन मूक हृदयाचे..
कधी ना ऐकले..
वेदना शब्द बंबाळ..
कानात गुंजू लागले..!!

असहाय्य जिणे माझे..
नाही कधी समजले..
माझ्याच मरणा मी..
डोळे भरून पाहिले..!!

*चकोर*

No comments:

Post a Comment