🌹आरती 🌹
🙏🏼🌹🙏🏼🌹
=◆=◆=◆=◆=
II राजे घ्या आता अवतार II
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
जय जय जी महाराज,
राजे घ्या आता अवतार..
सुराज्य भूमी स्थापण्या,
राजे घ्या हो पुढाकार..!! धृ !!
🙏🏼🌹🙏🏼🌹
=◆=◆=◆=◆=
II राजे घ्या आता अवतार II
=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=◆=
जय जय जी महाराज,
राजे घ्या आता अवतार..
सुराज्य भूमी स्थापण्या,
राजे घ्या हो पुढाकार..!! धृ !!
मातले शासनकर्ते,
सर्वउपद्रवी झाले..
भूमिपुत्रास बळजबरीने
भूमीहीन केले..!!
उरले सुरले सारे निसर्गे
अवकाळी लुटले..
अश्रू सुकले बळी राजाचे, ss
काळीज हो फुटले..!!०१!!
वाली नाही कोणी,
राजे रयतेस उरले..
पोखरून देशास
संपत्तीस परदेशी पुरले..!!
रक्षक ठरले भक्षक,
सारे कुरण लाटले..
मूक ढाळतो अश्रू , ss
राजे आभाळ फाटले..!!०२!!
हतबल झाली न्यायदेवता,
डोळेही मिटले..
ओरबाडून अब्रू,
श्वेत लांडगे सुटले..!!
भ्रष्टाचारी भस्मासुराने,
देशास घेरले..
जाती पातीचे विषबीज ते, ss
मनोमनी पेरले..!!०३!!
त्रिवार वंदन तुम्हास राजे,
तुम्हीच आमुचे धनी..
शिव छत्रपती महाराज,
द्रष्टा तुम सम नाही कोणी..!!
रंजल्या गांजल्याचे,
राजे तुम्हीच हो स्वामी..
हृदयी निरंतर वसतो, ss
राजा अमुचा हा गुणी..!!०४!!
जय जय जी महाराज,
राजे घ्या आता अवतार..
सुराज्य भूमी स्थापण्या,
राजे घ्या हो पुढाकार..!!
*******सुनील पवार.....
सर्वउपद्रवी झाले..
भूमिपुत्रास बळजबरीने
भूमीहीन केले..!!
उरले सुरले सारे निसर्गे
अवकाळी लुटले..
अश्रू सुकले बळी राजाचे, ss
काळीज हो फुटले..!!०१!!
वाली नाही कोणी,
राजे रयतेस उरले..
पोखरून देशास
संपत्तीस परदेशी पुरले..!!
रक्षक ठरले भक्षक,
सारे कुरण लाटले..
मूक ढाळतो अश्रू , ss
राजे आभाळ फाटले..!!०२!!
हतबल झाली न्यायदेवता,
डोळेही मिटले..
ओरबाडून अब्रू,
श्वेत लांडगे सुटले..!!
भ्रष्टाचारी भस्मासुराने,
देशास घेरले..
जाती पातीचे विषबीज ते, ss
मनोमनी पेरले..!!०३!!
त्रिवार वंदन तुम्हास राजे,
तुम्हीच आमुचे धनी..
शिव छत्रपती महाराज,
द्रष्टा तुम सम नाही कोणी..!!
रंजल्या गांजल्याचे,
राजे तुम्हीच हो स्वामी..
हृदयी निरंतर वसतो, ss
राजा अमुचा हा गुणी..!!०४!!
जय जय जी महाराज,
राजे घ्या आता अवतार..
सुराज्य भूमी स्थापण्या,
राजे घ्या हो पुढाकार..!!
*******सुनील पवार.....
No comments:
Post a Comment