Wednesday, 30 April 2014

II उपरती II



II उपरती II

माणुसकीची उपरती माणसाला, एखाद्या माणसाच्या अंत्ययात्रेत सहज प्राप्त होते. जीवनाचे खरे सार त्याला तिथेच अवगत होते. म्हणजे आपण काय आणले होते काय घेऊन जाणार, आयुष्यभर धावपळ करून पैसा कमावला कुठे कामी आला वैगैरे वगैरे.
अगदी आयुष्यात कधीही न बोललेल्या माणसाला सुद्धा तिथेच कंठ फुटतो आणि तो आपले अमोघ ज्ञान सर्वाना दान करत सुटतो.
पण हे सारे ब्रह्मज्ञान औटघटकेचे ठरते. एकदा का मृत शरीराचे सर्व सोपस्कार पार पडले की पुन्हा माणसाचे ये रे माझ्या मागल्या असे होते. मग कसली माणुसकी आणि कसले काय. पैश्याला इथे फुटतात पाय. आणि माणूस अविरत त्या मागे नुसता धावत रहातो अखेरच्या श्वासापर्यंत....

*चकोर*

No comments:

Post a Comment