II आंदोलन II
काय म्हणता राव..
आंदोलन कसे झाले..
उद्धिष्ट साध्य झाले..
बाकी तेल लावत गेले..!!
मिडीयाने मनोरंजन केले..
TRP चे खच पडले..
वातावरण पेटवायला..
माचिस नवं घेऊन आले..!!
पोलिसांचे हाल झाले..
वाली न त्यांस कोणी उरले..
कुटुंबास मागे ठेऊन..
बंदोबस्तास हजर झाले..!!
नागरिक हवालदिल झाले..
घाबरून त्यांनी खाडे केले..
खळ खटयाक आंदोलन..
शांततेत पार पडले..!!
ढोबळ अनुमान निघाले..
बार सारे फुसके झाले..
चर्चेचे गु-हाळ आता..
नव्याने सुरु झाले..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment