II अर्धांगिनी II
हे बंध कधी तुटायचे..
नाही मज तोडायचे..
आपले म्हणून फुलावे..
का तू कुस्करावे..
सख्या काय तुज म्हणावे..!!
कर्तव्य किती सहायाचे..
ना झुगारून द्यायचे..
क्षण क्षण मी झिजावे..
का तुज मोल नसावे..
सख्या काय तुज म्हणावे..!!
उपमेत किती जगायचे..
ना उपेक्षित राहायचे..
लक्ष्मी बोल गौरवावे..
का पायदळी तुडवावे..
सख्या काय तुज म्हणावे..!!
अर्धांगिनी मी मिरवायचे..
नाही दूर व्हायचे..
माहेर सासर तोलावे..
सांग कसे मन जोडावे..
सख्या काय तुज म्हणावे..!!
*चकोर*
हे बंध कधी तुटायचे..
नाही मज तोडायचे..
आपले म्हणून फुलावे..
का तू कुस्करावे..
सख्या काय तुज म्हणावे..!!
कर्तव्य किती सहायाचे..
ना झुगारून द्यायचे..
क्षण क्षण मी झिजावे..
का तुज मोल नसावे..
सख्या काय तुज म्हणावे..!!
उपमेत किती जगायचे..
ना उपेक्षित राहायचे..
लक्ष्मी बोल गौरवावे..
का पायदळी तुडवावे..
सख्या काय तुज म्हणावे..!!
अर्धांगिनी मी मिरवायचे..
नाही दूर व्हायचे..
माहेर सासर तोलावे..
सांग कसे मन जोडावे..
सख्या काय तुज म्हणावे..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment