Wednesday, 23 April 2014

II हट्ट II


II हट्ट II
======
कसे गेले आयुष्य आजवर..
विचार कधी केला नाही..
जोडली मी कैक नाती..
आपला कोणी भेटला नाही..!! 


हा आपला, अन तो परका..
दूजा भाव जपला नाही..
प्रेमाचा व्यवहार माझा..
का कुणास पटला नाही..!!
बोललो मी बोल मीठे..
किंतु मनात आणला नाही..
शुद्ध मानाचा भाव माझा..
का कुणीच जाणला नाही..!!

सांभाळिले मी सर्व जनांस..
उगा प्रसंग ताणला नाही..
मुर्ख समजती सारे मजला..
सल्ला कुणी मानला नाही..!!

अखंड वाहीलो दुखाःच्या डोही..
बांध कधी तोडला नाही..
बदलू पाहतंय जग मजला..
हट्ट मी माझा सोडला नाही..!!
*********सुनील पवार....

No comments:

Post a Comment