।। बालपण ।।
सरले बालपण आले मोठेपण..
मोठेपण कसले हे तर खोटेपण..!!
बालपणी होते मोठे विशाल मन..
आता उरले मात्र मनाचे कोतेपण..!!
बालपणी होते स्वच्छंद खेळाचे क्षण..
मोठेपणी उठले गर्दभी कामाचे व्रण..!!
बालपणी होते सर्व सुखाचे धन..
मोठेपणी करतो धनासाठी काय पण..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहित कधीच ते सोनेरी क्षण..!!
*चकोर*

No comments:
Post a Comment