।। घर ।।
भरले घर माणसांनी..
माणुसकी आता उरली नाही..!!
भरली ओंजळ सुखाची..
कुणास आता पुरली नाही..!!
गोतावळे सारे नात्याचे..
आप्तांस आता स्मरली नाही..!!
बक्कळ आला पैसा..
पोटं आता भरली नाही..!!
चौकोनी झाले कुटुंब..
हौस आता सरली नाही..!!
आदर्श झाली घरकुले..
यशस्वी आता ठरली नाही..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment