II खेळ भातुकलीचा II
खेळ रंगला भातुकलीचा..
राजाचा अन राणीचा..
दोन घडीचा डाव सजला..
स्वप्ने नयनी दाटलेला..!!
नकळे कोणी डाव मोडला..
का रागाचा पारा चढला..
गैर समजुतिचा खेळ सारा..
दोघे गेले दोन दिशेला..!!
कुठे राजा कुठे राणी..
आता डोळा उरले पाणी..
काय म्हणावे दैव गतीला..
रंग बदले क्षणा क्षणाला..!!
होता जरी डाव मोडला..
परी पुरता मनात राहिला..
निमित्त आता तेच आहे..
नित्य तुज आठवायला..!!
*चकोर*
खेळ रंगला भातुकलीचा..
राजाचा अन राणीचा..
दोन घडीचा डाव सजला..
स्वप्ने नयनी दाटलेला..!!
नकळे कोणी डाव मोडला..
का रागाचा पारा चढला..
गैर समजुतिचा खेळ सारा..
दोघे गेले दोन दिशेला..!!
कुठे राजा कुठे राणी..
आता डोळा उरले पाणी..
काय म्हणावे दैव गतीला..
रंग बदले क्षणा क्षणाला..!!
होता जरी डाव मोडला..
परी पुरता मनात राहिला..
निमित्त आता तेच आहे..
नित्य तुज आठवायला..!!
*चकोर*
No comments:
Post a Comment